खुलताबाद, (प्रतिनिधी) : खुलताबाद येथे सुफी संत हजरत शेख मुन्तजीबोद्दीन जर जरी जर बक्ष यांच्या उर्स महोत्सवास आमदार अब्दुल सत्तार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी दर्गाह येथे उपस्थित भाविकांशी संवाद साधत उर्स महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी दर्गाह कमिटीच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार यांचे स्वागत करण्यात आले. उर्स महोत्सवाच्या आयोजनाबाबत तसेच दर्गाह परिसरातील विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष अध्यक्ष सरफोद्दीन अॅड. कैसोरुद्दीन, दर्गाह कमिटीचे नगरसेवक अनिस रमजानी, जागीरदार, मुनीबुद्दीन वाजेद शेख, आवेझ बेग, दिलीप बावस्कर, दर्गाह कमिटीचे सदस्य आदिश अहमद, मीमबार मुदसशीर, शब्बीर अहमद, परवेज अहमद, शेख तौसिफ यांच्यासह दर्गाह कमिटीचे पदाधिकारी व सदस्य तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पा. गाढे, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.















